‘नवल’चा नायक सोनकुळे पुलावरून नाही तर थेट पाण्यावरून चालत असल्यासारखा “पायवाट न पाडता” हिंडतो-फिरतो, अतिअंतर्मुखतेच्या महाप्रलयी पाण्यावर…
सोनकुळे हा ‘नवल’चा कथानायक. नव्यानं पुण्यात दाखल झालेला एक अतिअंतर्मुख कॉलेजकुमार. भोवतीच्या वस्तू, घटना, क्रिया, हकिगतींचे जे नाट्यमय प्रतिसाद त्याच्या सजग संवेदक स्तरावर उमटतात, ते ‘नवल’मध्ये आपल्याला विंगेतून पाहायला मिळतात. काही वेचक संवाद आणि स्वगतांमधून सोनकुळेला ऐकत ऐकत, निवेदक जे पाहतो-दाखवतो ते पाहत ‘नवल’ परिसरात फिरताना केलेल्या या नोंदी.......